व्ही.पी.एस प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.सुहास विसाळ, श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये उपस्थित होत्या.
दोन्ही विभागांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला आणि विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुखांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आणि योगासने यांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. प्रशालेची माजी विद्यार्थिनी कुमारी अनुजा केदारीने प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रात्यक्षिकांना नंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी सूर्यनमस्कार आणि योगासने केली.
उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ आणि श्रीमती अक्षता पाध्ये यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व सांगितले तसेच वरुणराजाला प्रार्थनेच्या आणि कवितेच्या मदतीले आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भीमराव राऊत यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय श्री.ज्ञानेश्वर बुरांडे यांनी केला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री.सुनील बागल, श्री.शीतलकुमार सुतार, श्री.मयुर विटे, यांनी सहकार्य केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना शुभेच्छा दिल्या.