लोणावळा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लोणावळा, संपादक:संजय पालवे
लोणावळा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणावळा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रकाश हॉल या ठिकाणी पार पडली झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष श्री.आदिनाथ दहिफळे होते. सभेची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. उपस्थित सभासदांचे स्वागत सभेच्या अध्यक्षांनी केले.
पतसंस्थेच्या चिटणीस श्रीमती मंजुश्री ईकारी यांनी मागील वर्षाचा अहवाल वाचन सभेसमोर केले. खजिनदार श्री.संतोष ठाकूर यांनी ताळेबंद सभेसमोर मांडला. आर्थिक वर्ष 2025-26 साठी 9.10 टक्क्यांनी डिव्हिडंटचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागील वर्षभरामध्ये सेवानिवृत्त, बढती प्राप्त, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि पुरस्कार प्राप्त सभासद यांचा सभेतर्फे भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
श्रीमती मंजुश्री ईकारी यांनी सभेसमोर काही महत्वाचे विषय मांडले. मांडलेल्या विषयांवर सभेमध्ये साधक-बाधक चर्चा झाली, चर्चेनंतर विषयाचे ठरावांमध्ये रूपांतर करण्यात आले.
संस्थेसाठी श्री.निलेश ढाकोळ यांची लेखनीक, श्री.बाळू पिंगट यांचे स्थानिक हिशोब तपासणी तर श्री.मुकुंद जगताप यांची सेवक पदावर नियुक्ती करण्यात आली.
सभेसाठी श्री.आदिनाथ दहिफळे (अध्यक्ष), श्रीमती सायली आपटे (उपाध्यक्ष), श्रीमती मंजुश्री ईकारी (चिटणीस), श्री.संतोष ठाकूर (खजिनदार), श्री.भगवानभाऊ आंबेकर (तज्ञ संचालक), श्री.सोपान ठाकूर (तज्ञ संचालक), श्री.महेश चोणगे, श्री.प्रकाश पाटील, श्री.योगेश कोठावदे, श्री.विठ्ठल खेडकर, श्री. अनिल खामकर, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.रवी दंडगव्हाळ (सदस्य), श्री.कुंडलिक आंबेकर (लेखनिक) उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्रीमती सायली आपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्री.विजय राठोड यांनी छायाचित्रण केले.
स्नेहभोवल्यानंतर सभेची सांगता करण्यात आली.