भाजे हायस्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतरांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न
लोणावळा, संपादक: संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ .सरस्वती बैले , प्रयोगशाळा परिचर श्री मुकुंद भोसले , ज्येष्ठ सेवक श्री जयराम उंबरे यांचा सेवापूर्ती समारंभ मंगळवार, दिनांक 30 जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ .मृणालिनी गरवारे , कार्यवाह डॉ . सतीश गवळी व सहकार्यवाह श्री विजय भुरके यांच्या प्रेरणेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष पवार व पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी कार्यवाह डॉ .सतीश गवळी सर, नियामक मंडळ सदस्य श्री भगवान आंबेकर , श्री प्रमोद कुदळे , सौ साधना कुदळे, श्री विद्या बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे, व्ही.पी.एस . प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नरके तसेच उत्सव मूर्तींचे आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यिंनींनी अतिशय मधुर स्वरात ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते उत्सव मूर्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रोहिदास डिकोळे यांनी केले. संस्थेच्या विविध विद्याशाखांमधील माजी शिक्षक श्री भीमराव माने , श्री गिरमकर, श्रीमती अश्विनी दुर्गुडे , पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर, मुख्याध्यापक श्री संतोष पवार , विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत , सुशांत बालगुडे यांनी आपल्या मनोगतातून सर्व उत्सव मूर्तींच्या कार्याचा गौरव करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ शिक्षिका सौ. सरस्वती बैले मॅडम यांनी आपण संस्थेच्या व शाळेच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला. प्रयोगशाळा परिचर श्री मुकुंद भोसले यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या ऋणातून मी कधीही मुक्त होणार नाही तसेच यापुढेही संस्थेस व विद्यालयास माझे कायम सहकार्य राहील . आपल्या वडिलांविषयी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला .
ह.भ.प.कै.श्री काशिनाथ बाबा भोसले म्हणजेच बाबांनी भागवत धर्माची पताका माझ्या खांद्यावर दिली आहे, ती मी अखंडपणे फडकावत राहील तसेच संसारात पत्नीची फार मोठी साथ मिळाली म्हणूनच मी जीवनात यशस्वी झालो आहे अशी भावना व्यक्त केली . तसेच सेवक श्री जयराम उंबरे यांनी आपल्या सुरुवातीच्या जीवनातील खडतर प्रवास सांगितला व संस्थेच्या कृपेने मी जीवनात कसा स्थिर झालो हे सांगून संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
संस्थेचे नियामक मंडळ सदस्य श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी ही शाळा उभी करण्यासाठी कै.काशिनाथ बाबा भोसले ,श्री.आंबेकर, श्री.बुधाजी राऊत कुटुंबाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यवाह डॉ.श्री. सतीश गवळी सर यांनीआपल्या मनोगतात संस्थेच्या प्रगतीत सौ बैले मॅडम , श्री.मुकुंद भोसले आणि श्री.जयराम उंबरे यांच्या योगदानाबद्दल आभार मानले व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.राजेंद्र होले यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . कला शिक्षक श्री.धुळाजी देवकाते यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती सदस्य सौ ललिता पवार, श्रीमती अश्विनी दुर्गुडे, सौ.कविता गायकवाड, सौ.शितल हिंगे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक प्रतिनिधी श्री.श्रीराम तांदळे यांनी आभार मानले.