व्ही.पी.एस मधील शिक्षकांनी घेतला पालखीचा मान

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
      व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.   
   यावर्षी वेगळ्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींबरोबरच ग्रंथ दिंडीचे सुद्धा आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रखुमाई, आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामघोषामधे पालखी मिरवणूक करण्यात आली. 
    दिंडीची सुरुवात पालखी आणि ग्रंथ पूजनाने झाली. उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, शिक्षक प्रतिनिधी श्री.कल्याण चौगुले, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सिताराम घारे, शिक्षक, शिक्षिका आणि सेवक यांनी पालखी पूजन केले. पालखी सोहळ्यामध्ये प्रशालीचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सेवक यांनी आनंदाने सहभाग घेतला.
     पावसाचा धुमाकूळ चालू असताना देखील प्रशालेचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी स्वसंरक्षणासाठी छत्र्या आणि रेनकोट घेऊन पालखीमध्ये सहभाग घेतला. ढोल ताशाच्या गजरामध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली. यंदा पालखी मिरवणुकीचा मान विद्यार्थी आणि शिक्षिका यांना मिळाला.
    चित्रकला विभागातर्फे श्री.महेश चोणगे आणि श्री.विक्रम शिंदे यांनी फलक लेखन केले. पालखी सजावट श्री.गजानन कदम आणि श्री.मयुर पवार यांनी केले आणि यासाठी सर्व सेवकांनी सहकार्य केले.  सोहळा संपन्न झाल्या नंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून घरी सोडण्यात आले.
    पालखी सोहळ्यासाठी नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री विजय रसाळ, उपमुख्याध्यपिका श्रीमती प्रज्ञा शुक्ल, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थी, शिक्षक, सेवक आणि पालक यांना शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव