व्ही.पी.एस मध्ये स्व.अजितदादा पवार जयंती निमित्त प्रतिमापूजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जयंती निमित्त व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अजितदादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 
     अजितदादा पवार यांचे काही महिन्यापूर्वी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. अजितदादा स्वतंत्र महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री होते. त्याचबरोबर त्यांना राज्याच्या राजकारणाचा मुरब्बी नेता म्हणून ओळखले जात होते. 
     उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अजितदादा यांनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सलग सोळा वर्ष काम पाहिले होते.
    स्व.अजितदादा पवार बारामती मतदारसंघामधून सलग सात वेळा आमदार तर एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचा 44 वर्षाचा अनुभव होता. 1982 पासून दादा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. 
     स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त प्रशालेचे प्राचार्य श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षदा पाध्ये, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नरके मॅडम, शिक्षक प्रतिनिधी श्री.कल्याण चौगुले, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सिताराममामा घारे, समाजसेवक श्री.राजू खांडेभरड, पालक श्री.मोकाशी, श्री.पवार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव