नागपंचमी निमित्त मेहंदी स्पर्धा व सर्पमित्राचे व्याख्यान

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
Digital news
    विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात नागपंचमी निमित्त मेहंदी स्पर्धा तसेच सर्पमित्रांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
  मेहंदी स्पर्धा प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये दोन सत्रांत घेण्यात आली. पहिल्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवी, तर दुसऱ्या सत्रात इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
    लहान गटामध्ये कु. समीक्षा बोरेकर यांनी प्रथम, कु. वेदिका पाटेकर यांनी द्वितीय, तर कु. राम इंद्रबहादूर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटामध्ये अनुक्रमे कु.मनिषा तोमर (प्रथम), कु.सिद्धी ठाकर (द्वितीय) क्रमांक पटकावला.
      नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांच्या मनातील सापांविषयीच्या शंका व भीती दूर करण्यासाठी प्रशालेतर्फे फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन संस्थेचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक श्री. ज्ञानेश्वर लष्करे, वन्यजीव डॉक्टर व खजिनदार डॉ. गणेश सोरटे तसेच प्राध्यापक श्रीमती सुपर्णा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सापांचे विविध प्रकार, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच सापांचे निसर्गातील महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मंचावर प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्री. कल्याण चौगुले आणि ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे नियोजन संस्कृत विभागप्रमुख श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सुनीता इथापे यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती अक्षता पाध्ये यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनी मानले.
    मेहंदी स्पर्धेचे परीक्षण श्रीमती सुनीता इथापे, श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती ज्योती डामसे श्रीमती कल्याणी म्हसे, श्रीमती शिवानी बागलाने आणि श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.    
     नागपंचमी निमित्त नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके तसेच नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
  
   

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव