व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा


लोणावळा, संपादक संजय पालवे 
   विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व समजावे तसेच खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावना विकसित व्हावी, या उद्देशाने प्रशालेत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
      कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व, नियमित व्यायामाचे फायदे आणि खेळामुळे होणारा सर्वांगीण विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
      विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळ, क्रीडा स्पर्धा व मनोरंजक उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत क्रीडा दिनाचा आनंद लुटला. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवर, शिक्षक व क्रीडा विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
       नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये आणि ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती वैशाली तारु, श्री.भीमराव राऊत, श्री. ज्ञानेश्वर बुरांडे शिक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा