गणेशोत्सवानिमित्त गीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादलोणावळा
लोणावळा, संपादक: संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त संगीत विभागाच्या वतीने गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत वैयक्तिक तसेच सामूहिक गीतांचा समावेश होता. सुमारे ३० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव तसेच गणरायावर आधारित विविध गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
संगीत विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे यांनी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले. स्पर्धेदरम्यान प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनीही एका गीताचे सादरीकरण केले. शिक्षक प्रतिनिधी श्री. कल्याण चौगुले यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक श्री. महेश चोणगे व श्री. विक्रम शिंदे यांनी केले. वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत कु. तन्वी गोणते (प्रथम), रुद्र इंगुळकर (द्वितीय), कु.आर्या किशोर (तृतीय), साईराज आहेर (चतुर्थ), तर विराज गिड्डे (पाचवा)क्रमांक पटकावला.
सामूहिक गीत गायन स्पर्धेत इयत्ता नववी ‘अ’ ने प्रथम, इयत्ता आठवी ‘ब’ ने द्वितीय, तर इयत्ता आठवी ‘अ’ ने तृतीय क्रमांक मिळवला.
श्री हरिभाऊ कुलकर्णी, श्री.विक्रम शिंदे आणि श्री. महेश चोणगे यांनी गाणी गायली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. योगेश कोठावदे आणि श्री. वैभव सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्यं मिळाले. कार्यक्रमाचे चित्रीकरण श्री. संजय पालवे यांनी केले, तर कार्यक्रमाची व्यवस्था श्री. मयूर पवार यांनी पाहिली.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये तसेच प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर यांनी आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.