प्राचार्य प्रज्ञा शुक्ल यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरव
लोणावळा, संपादक : संजय पालवे
५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळा परिसरातील शाळांमधील मुख्याध्यापकांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यंदा लोणावळा परिसरातील चार मुख्याध्यापकांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय, लोणावळा येथील प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांचा समावेश आहे.
लोणावळा येथील हॉटेल चंद्रलोक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी श्रीमती विद्या वकारे (झोन चेअरमन), श्री. यश सोनवणे (अध्यक्ष), ॲड. श्री. राजेश देसाई (खजिनदार), श्री. सुमित बदेशिया (सचिव) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल या विद्यार्थ्यांप्रती समर्पित शिक्षिका असून प्रशालेची प्रशासकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. विविध प्रशासकीय आव्हानांचा सामना करताना कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकांना सोबत घेऊन त्या प्रशालेचे कामकाज प्रभावीपणे पार पाडत आहेत.
प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या प्रसारिणी सभा नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके तसेच नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.