सिक्युरिटी गार्डच्या पगारवाढीचा सात महिन्यांचा लढा यशस्वी

संपादक, संजय पालवे 
      गेल्या सात महिन्यांपासून सिक्युरिटी गार्ड यांच्या पगारवाढीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे सिक्युरिटी गार्डच्या पगारवाढीचा प्रश्न मार्गी लागला असून, या यशामुळे सिक्युरिटी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
       या लढ्यात श्री. संदीप गायकवाड यांनी विशेष प्रयत्न करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच कापूरवाडी गावचे सरपंच श्री. सचिन शेठ दुसुंगे, मेहेकरी गावचे उपसरपंच श्री. संभाजी पालवे आणि अॅड. श्रीमती मीनाक्षी सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
      सिक्युरिटी गार्डच्या पगारवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे सिक्युरिटी बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या लढ्याला मिळालेले यश हे सर्वांच्या एकजुटीचे आणि प्रयत्नांचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा