महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये विविध उपक्रम

लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. 
   जयंतीनिमित्त प्रशालेत स्वच्छता रॅली, शालेय परिसर स्वच्छता, स्वच्छता जनजागृती तसेच ‘स्वच्छ व सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
     स्वच्छता रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेविषयक फलक घेऊन घोषणाबाजी केली. तसेच नागरिकांना आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
     प्रशालेतील प्रकाश हॉलमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात वेदांत वाघिरे, समृद्धी जरदाळे आणि कस्तुरी कालेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर दुसऱ्या गटात पूनम गलधर, क्रीया गायकवाड आणि स्वरूपा हरपुडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
    कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये उपस्थित होते. प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे नियोजन संस्कृती विभागप्रमुख श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढूमणे यांनी केले, तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण श्री. शिवकुमार दहिफळे आणि श्रीमती मनीषा खेडकर यांनी केले.
     प्रशालेत सातत्याने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्वच्छता जनजागृती रॅली तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री .विजयजी भुरके तसेच नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री .भगवानभाऊ आंबेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा