महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये विविध उपक्रम
लोणावळा, संपादक : संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रशालेत स्वच्छता रॅली, शालेय परिसर स्वच्छता, स्वच्छता जनजागृती तसेच ‘स्वच्छ व सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्वच्छता रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेविषयक फलक घेऊन घोषणाबाजी केली. तसेच नागरिकांना आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. प्रशालेतील प्रकाश हॉलमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात वेदांत वाघिरे, समृद्धी जरदाळे आणि कस्तुरी कालेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृती...